Wednesday, April 26, 2023

ब्रेड पनीर रोट्स


 

आपण आज ब्रेड पनीर रोट्स ही रेसिपी बनवणार आहोत. जाणून घ्या याची साहित्य आणि कृती. 

साहित्य :- 

  • ब्रेडच्या स्लाईसेस १६ 
  • अर्धी वाटी पनीर 
  • दीड वाटी साखर 
  • अर्धी वाटी ओल्या खोबर्याचा कीस 
  • बदाम 
  • काजू ३-४ 
  • वेलची पूड 
  • १ लिंबू 
  • चिमुटभर खाण्याचा पिवळा रंग. 
कृती :-
 

  • पनीर चांगले मळून त्यात काजू, बदामाची जाडसर पूड, वेलची पूड व १-२ चमचे पिठीसाखर टाकून सर्व चांगले मिसळावे. 
  • ब्रेडच्या स्लाईसेसच्या कडा काढून त्या पाण्यातून काढून हाताने दाबाव्यात म्हणजे पाणी निघेल. 
  • नंतर त्यात पनीरचे थोडे सारण भरावे व अलगद हाताने गोल गुंडाळी करावी. अशा रीतीने सर्व रोट्स करावेत व ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे.
     
  • नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात लिंबाचा रस व पिवळा रंग टाकावा. पाक गरम असू द्यावा. 
  • तूप गरम करून त्यात ब्रेडचे तयार केलेले रोट्स हळूहळू तळावे व बदामी रंगावर तळल्यावर गरम पाकात टाकावे. 
  • पाकातून काढून एका ताटात खोबऱ्याचा कीस पसरवून त्यावर रोट्स घोलावेत व सर्व्ह करावे. 
  • हे रोट्स खोब्र्यामुळे पांढरे व आकर्षक दिसतात. 
 

No comments:

Post a Comment