लवकरात लवकर तयार होणारी रेसिपी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. ती रेसिपी म्हणजे बटाट्याचे धिरडे. बटाट्याचे धिरडे बनवण्यासाठी जास्त वस्तूची गरज नाही. घरातील आहेत त्या वस्तू वापरून तुम्ही धिरडे बनवू शकता.
साहित्य :-
- २ कच्चे बटाटे किसून
- २ हिरव्या मिरच्या
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- १/४ लहान चमचा मिरेपूड
- १ मोठा चमचा तूप
- सैंधव मीठ चवीप्रमाणे
- सर्वात आधी किसलेले बटाटे, मिरची, कोथिंबीर, मिरेपूड, मीठ मिसळून घ्या.
- आता तवा गरम करून त्यावर तूप घाला.
- नंतर तव्यावर मिश्रण घालून पसरवून घ्या.
- आता एक बाजूने शेकून उलटून घ्या.
- दुसऱ्या बाजूने देखील लाल झाल्यावर दही आणि चटणीसोबत सर्व्ह करा.
- अशाप्रकारे तयार आहेत बटाट्याचे धिरडे. तुम्ही हे सकाळच्या नाश्ता करण्यासाठीपण बनवू शकता.
No comments:
Post a Comment