Sunday, April 16, 2023

अंडा करी

साहित्य :- दोन अंडी उकळललेले, उकळलेले दोन बटाटे, अर्धा चमचा जिरे, दोन तेज पान, दोन लाल मिरच्या, चार लवंग, वेलची, दालचिनी, बारीक चिरलेले दोन कांदे, किसलेले दोन टोमॅॅटो, एक चमचा आलं-लसून पेस्ट. 

मसाला :- अर्धा चमचा हळद, एक चमचा जिरे पूड, एक चमचा धने पूड, एक चमचा लाल मिरची पूड, एक चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, एक चमचा देशी तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाच काजू, एक चमचा खसखस, एक चमचा तीळ हे सर्व मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. 

करावयाची कृती :- अंड्याच्या वरील भागात चाकूने क्रॉस करून घ्या. बटाटे दोन भागात कापून घ्या. कढईत तेल गरम करून बटाटे हलक्या रंग येईपर्यंत तळून घ्या. आता फोडणीसाठी वेगळे तेल गरम करून कांदा टाका आणि सोनेरी रंग होईपर्यंत तळा, नंतर टोमॅॅटो, आले-लसूण पेस्ट टाका, लाल मिरची, गरम मसाला टाका आणि मसाला सोडेपर्यंत शेका. काजूचे पेस्ट टाकून हालवा आणि एक कप पाणी टाका. आता बटाटे आणि अंडे टाकून पाच मिनिटे झाकून ठेवा. नंतर उतरवून घ्या. कोथिंबीर टाकून सजवा आणि गरमागरम पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा. 









No comments:

Post a Comment