Tuesday, June 13, 2023

आंब्याचा जॅॅम


 




* साहित्य :- 

१) २ आंबे 

२) ७० ग्रॅॅम साखर 

३) २ लिंबूचा रस. 



* कृती :- 

१) २ आंबे स्वच्छ धुवून कपड्याने पुसून आंब्याच्या फोडी करून घ्याव्यात. व ह्या फोडी मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी. 

२) आंब्याचा रस जाड बुडाच्या पातेल्यात काढून त्यात साखर घालून मंदाग्नीवर सारखं ढवळावे उकळी 

आल्यावर मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करून ढवळावे. 

३) प्रत्येक वेळी रंग बदलत जातो. 

४) त्याचा रंग पारदर्शक होऊन घट्ट झाल्यावर गॅॅस बंद करून गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावे ब्रेड पोळीबरोबर सकाळी नाश्त्याला ही घेऊ शकतो. 

No comments:

Post a Comment