बेसन पोळी
साहित्य : - दोन वाट्या डाळीचे पीठ
- तीन मिरच्या किंवा दीड चमचे तिखट
- पाच-सहा लसूण पाकळ्या
- अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट
- एक चमचा जीर, पाव वाटी तेल
- दोन वाट्या कणीक
- दोन वाट्या पाणी
- चार चमचे तेल
- एक चमचा मीठ
कृती : - दोन वाट्या डाळीच्या पिठात मीठ घालावे. मग लसूण, जीर, मिरची व शेंगदाण्याचा कूट बारीक वाटून त्याचा गोळा या पिठात मिसळावा आणि दोन वाट्या पाणी घालावे.
- आता कढईत पाव वाटी तेल घालून तापवावं.
- त्यात हे मिश्रण ओताव.
- दोन-तीन सणसणीत वाफा आणाव्यात व गार होऊ द्यावं.
- मिश्रणाचा गोळा झाला पाहिजे.
- दरम्यान कणीक नेहमीप्रमाणे भिजवावी आणि तेल लावून मळून मऊ करून घ्यावी. मग पुरणाच्या पोळ्या करतो तशा उंडा भरून या बेसन पोळ्या करायच्या आहेत.
- अशा प्रकारे बेसन पोळी तयार होईल.
No comments:
Post a Comment