Thursday, May 4, 2023

कैरी रोल


 


आज आपण कैरी रोल कस बनवतात याची साहित्य आणि कृती जाणून घेऊ.
 

साहित्य :- 

  • कैऱ्या १ किलो 
  • साखर ३०० ग्रॅम 
  • निवडलेला पुदिना - अर्धी वाटी 
  • साध मीठ - १ कहाण चमचा 
  • काल मीठ - चवीपुरते 
  • तूप - ताटाला लावण्यासाठी 
  • खाण्याचा हिरवा रंग - ३-४ थेंब 
  • कढई 
  • मध्यम आकाराचे ताट 
  • मिक्सरचे मोठे भांडे, मिक्सर 
  • कुकर 
कृती :-
 

  • प्रथम कैऱ्या धुवून पुसून घ्याव्यात. 
  • कैऱ्याची सालं काढून चौकोनी फोडी तयार कराव्यात. त्या फोडीमध्ये थोडे पाणी घालून कुकरला ३ शिट्या होईपर्यंत शिजवावे. फोडी मऊ शिजतील असे पहावे. 
  • पुदिन्याची पाने थोडे मीठ घालून मिक्सरवर बारीक वाटावे. 
  • वाटलेला पुदिना, साखर, खाण्याचा रंग, मीठ शिजवलेल्या कैरीत मिसळून लगदा तयार करावा. असा लगदा तयार करण्यासाठी मी हँड ब्लेंंडरचा वापर केला. 
  • तयार लगदा पुरणाच्या जाळीतून गळून घ्यावा जेणेकरून कैरीच्या शिरा वेगळ्या होतील. 
  • त्यानंतर गाळून घेतलेला लगदा ३-४ मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यावा. 
  • एका मध्यम आकाराच्या ताटाला तूप लावून त्यात शिजवलेला गोळा टाकावा व मिश्रण ताटात पसरवावे. मिश्रणाचा पातळ लेयर येण्यासाठी पसरवण्याची क्रिया भरभर होणे आवश्यक आहे. 
  • हे ताट दिवसभर उन्हात सुकण्यासाठी ठेवावे. सुक्ल्यानंतर लांब पट्ट्या कापून रोल तयार करावेत. 

No comments:

Post a Comment