Wednesday, May 3, 2023

चिकन चिली


 

चिकन चिली बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे आहे.
 

साहित्य :- 

  • बॉयलर चिकन २५० ग्रॅम 
  • मध्यम आकाराच्या सिमला मिरच्या ३ 
  • आलं-लसूण-मिरची-जिरे- व कोथिंबीरची पेस्ट २ मोठे चमचे 
  • यात मिरच्या थोड्या जास्त घालाव्यात. 
  • ८-१० मोठ्या लसूण पाकळ्या गोल काप करून. 
  • धणे-जिरे पावडर १ चमचा 
  • गरम मसाला १ चमचा 
  • हळद अर्धा चमचा 
  • तेल २ चमचे 
  • पाणी 
  • मीठ चवीनुसार 
  • सजावटीसाठी ओल खोबर, चिरलेली कोथिंबीर व लिंबू. 
कृती :-
 

  • चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. 
  • एका भांड्यात पाणी व थोडेसे मीठ घालून त्यात चिकन उकडून घ्यावी. त्यातील पाणी काढून टाकावे. 
  • सिमला मिरचीतील बिया काढून पातळ उभे काप करून घ्यावे. 
  • दुसऱ्या भांड्यामध्ये तेल गरम करून त्यावर चिरलेली लसूण. तयार वाटण व गरम मसाला, हळद, धणे-जिरे पावडर, गरजेनुसार मीठ आणि मिरचीचे काप घालून परतावे. 
  • झाकण ठेवून पाच मिनिटे मंद आचेवर ठेवावे. मिरची मऊ झाल्यावर त्यात उकडलेली चिकन घालून व्यवस्थित एकत्र करावे. 
  • पुन्हा पाच मिनिटे झाकण न ठेवता शिजू द्यावे. 
  • प्लेटवर काढून त्यावर ओल खोबर व कोथिंबीर भुरभुरावी. 
  • खाताना त्यावर लिंबू पिळला की अप्रतिम चव येते. 

No comments:

Post a Comment