Thursday, May 4, 2023

काकडीचे थालीपीठ


 

काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
 

  • २ मोठ्या काकड्या 
  • मीठ 
  • तिखट 
  • हळद 
  • चिमुटभर ओवा 
  • चमचाभर तीळ 
  • धणेपूड 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 
  • कणिक किंवा मिक्स्ड ग्रेन आटा 
  • तेल 
कृती :-
 

  • काकड्याची सालं सोलून काकड्या किसून घ्यायच्या. 
  • साधारण ५ मिनिट मोठ्या गाळणीवर ठेवून पाणी गळू द्यायचं. कीस पिळायचा नाही. 
  • किसात आता पीठ सोडून, बाकी सगळे घटक घालून, हलक्या हाताने मिसळून घ्यायचे. 
  • या मिश्रणात, व्यवस्थित घट्ट गोळा होईल इतपत पीठ घालायचे.
  • एकीकडे तवा तापत ठेवायचा. 
  • २-३ मिनिटात थालीपीठ लावून, तेल घालून, खरपूस भाजायची. 

No comments:

Post a Comment