लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडणारा पदार्थ म्हणजे फळांचे सॅॅलेड होय. चला तर मग बघूया साहित्य आणि कृती काय आहे.
साहित्य :-
- १ अननस
- २ सफरचंद
- २ केळी
- १ काकडी
- २ मोठे टोमॅॅॅटो
- २ ढोबळी मिरची
- २ संत्री
- १ आंबा
- १ कप दही
- २ मोठे चमचे क्रीम
- २ लहान इलायची
- १ चिमुट लाल तिखट पावडर
- मीठ
- काळी मिरी चवीप्रमाणे
- आंबा सोलून कुस्करून घ्या. इलायची सोलून घ्या.
- आंबा, दही, क्रीम, इलायची पावडर, मीठ, काळी व लाल तिखट, सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढा व ठेवून द्या.
- अननस सफरचंद, केळी व काकडीचे लहान चौकोनी तुकडे करा.
- टोमॅटोच्या बिया काढून चिरा, ढोबळी मिरची गोल करा. संत्री सोलून तुकडे करा.
- चिरलेली फळे व भाज्या एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवा.
- वाढताना बाऊलमध्ये आधी सॅॅलेड टाका व नंतर परतून आंब्याची एकत्र केलेली पेस्ट टाकून वाढा.

No comments:
Post a Comment