Saturday, May 6, 2023

पेरूची कोशिंबीर


 

आज आपण पेरूची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहूया. 

साहित्य :- 

  • ३-४ मोठे दळदार पिकलेले पेरू 
  • ३-४ मध्यम बटाटे 
  • २-३ पातीसह कांदे 
  • ३ हिरव्या मिरच्या 
  • ४-५ कोथिंबीरच्या काड्या 
  • ४-५ पुदिन्याच्या काड्या 
  • १ चमचा मीठ 
  • १ चमचा साखर 
कृती :- 

  • बटाटे उकडून सोलावे, कांदे, पात, मिरच्या, कोथिंबीर व पुदिन्याची पाने बारीक चिरावी. 
  • पेरूच्या बियांचा भाग टाकून द्यावा. साल काढून टाकून गर बारीक चिराव्या. 
  • सर्व एकत्र अलगद मिसळावे. मीठ व साखर घालावी. 
  • लिंबाचा रस पिळावा व गार करून ही कोशिंबीर खायला द्यावी. 
  • उपासासाठी करायची असल्यास पुदिना व कांदे वगळावे. 
  • त्याऐवजी अर्धा चमचा जिरेपूड घालावी. 
  • तयार आहे स्वादिष्ट पेरूची कोशिंबीर. 


No comments:

Post a Comment