Wednesday, April 19, 2023

मक्याचे कटलेट्स


 


साहित्य :-

  • ५ मध्यम आकाराचे बटाटे 
  • १ वाटी मक्याचे दाणे-अमेरिकन पिवळे मके असतील तर उत्तमच 
  • ३ ते ४ हिरव्या मिरच्या 
  • साधारण २ पेरा एवढा आल्याचा तुकडा 
  • ४ ते ५ लसूण पाकळ्या 
  • ४ ते ५ ब्रेड स्लाईस 
  • ४ ते ५ चमचे रवा 
  • मीठ, तेल.

कृती :-

  • सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या. मक्याचे दाणे काढून तेही बटाट्यांंबरोबर उकडा. चाळणीवर टाकून मक्यातले पाणी काढून टाका. बटाटेही चाळणीवर टाकून कोरडे होऊ द्या. साले काढून बारीक करून घ्या.  
  • पावाचे स्लाईस पाण्यातून काढा व पिळून घ्या. हा गोळा किसलेला बटाटा व मक्याच्या दाण्यात मिसळा.
  • आले,लसूण, मिरची वाटून त्याची पेस्ट करा व ही पेस्ट वरील गोळ्यात मिसळा.
  • मीठ चवीनुसार घाला. हे मिश्रण मळून सगळीकडे तिखट मीठ लागेल असे पाहा.
  • एका ताटलीत रवा घ्या. गोल, लांबट हव्या त्या आकाराचे कटलेट वळा व हे कटलेट रव्यात घोळवा आणि पॅॅनमध्ये मध्यम आचेवर शॅॅलोफ्राय करा.
  • गरम गरम कटलेट टोमॅटो सॉस किंवा चिंचगूळ खजुराची चटणीसोबत सर्व्ह करा.   
         अशाप्रकारे मक्याचे कटलेट्स तयार आहेत. तुम्ही घरी देखील करून बघू शकता. 

No comments:

Post a Comment