Thursday, April 27, 2023

मूगडाळ खीर


 

मूगडाळ हलवा अनेकदा खाल्ला असेल. यासोबतच मूगडाळीपासून बनवलेली मिठाई ही अनेकांना आवडते. आता मूगडाळची खीर बनवून पहा, मूगडाळीमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे यापासून बनवलेली खीर स्वादिष्ट तसेच आरोग्यपूर्ण असेल. मूगडाळ खीर ही सामान्यतः दक्षिण भारतातील डिश आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 

साहित्य :- 

  • अर्धी वाटी तांदूळ 
  • एक टीस्पून वेलची पूड 
  • दोन चमचे तूप 
  • पाणी 
  • बेदाणे 
  • पाव वाटी मूगडाळ 
  • दोन वाट्या दुध 
  • अर्धी वाटी गुळ 
  • केशर 
  • काजू.
     
कृती :- 

  • मूगडाळ खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तूप गरम करा. 
  • तूप गरम झाल्यावर त्यात काजू आणि बदाम टाकून परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात काहु आणि बदाम टाकून परतून घ्या. परतून झाल्यावर गॅस बंद करून मनुका घाला. 
  • आता हे सर्व ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून ठेवा. परत एकदा कढईत मूगडाळ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. 
  • मूगडाळ सोनेरी झाल्यावर बाहेर काढून तांदूळ परतून घ्या. 
  • डाळ आणि तांदूळ व्यवस्थित परतल्यावर ताटात काढा. 
  • आता कढईत तूप टाकून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात डाळ आणि तांदूळ घालून गूळ घाला. 
  • गुळ चांगला वितळला की त्यात वेलची पूड घाला.
     
  • केशरच्या कांड्या घाला. हे मिश्रण चांगले घट्ट होऊ द्या. नंतर त्यात काजू आणि बदाम टाका. 
  • शेवटी थंड दुध घाला. 
  • स्वादिष्ट आणि आरोग्यदायी मूगडाळ खीर तयार, गरम किंवा थंड सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment